Sunday, March 5, 2017

एश-टी चा पायलट, आणि त्याचा cockpit

बाई मास्तरांना म्हणाल्या, ड्रायव्हर काकांना एश-टी हळू हकायला request  करा की.
मास्तर म्हणाले ते काय ऐकणार नाहीत, 100 च्या speed  वर उडवतील. तुम्हीच बोला.

बाई काही तरी त्यांना कुजबुजल्या, ड्रायव्हर  ने होकार दिला. बाई खुश झाल्या.

lights बंद झाल्या.
रात्री चे 9 वाजले असतील
माझा डोळा लागला.

मग अचानक ड्रायव्हर ने आपली केबिन light लावली.
भांगड कळली नाही

मग दिसलं. ड्रायव्हर त्याच्या शेजारच्या गडीं ने तंभाखु मळून दिला.
ड्रायव्हर ने डाव्या हाथाचा कोपरा ठेवला steering वर आणि उजव्या हाथाने angle  बनवून तंभाखु  टाकला तोंडात.

मग काय आई शप्पथ!

कसल 100kmph नि कसलं 120. गाडी च cockpit झालं, आणि त्याचा  pilot.
माळशेज घाटातना गाडी जी उडविली, थेट मुरबाड डेपोत पोहोचली. 
ज्यो side देत न्हवता त्याच्या कानाचा भोंग्या ने भुगा केला. 
Ashok Leyland  ची ती एश टी आणि त्यात हा पायलट. 
जेवढा वेळ सकाळी खांडस हुन भीमाशंकर - शिडी घाटाने कसरत करून चढायला लागला, त्याहुन अर्ध्या वेळात ह्या pilot ने रात्री आळेफाटा ते कल्याण डेपो मध्ये गाडी उडविली होती.